एका लग्नाची पुढची गोष्ट
आज सकाळी पेपरला “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकाची जाहिरात बघितली. पोरांना शाळेला सुट्टी पण होती, त्यामुळे आज हे नाटक बघायचा योग जुळून आला होता. बुक माय शो वर चेक केलं तर तिकीट उपलब्ध नव्हतं. एक चान्स घ्यावा म्हणून, प्रशांत दामले सरांना मेसेज केला. काही मिनिटांतच सरांचा मेसेज आला, “चेक करतो…कन्फर्म आहे, होतील 2 तिकिटं…






