बुक फेस्टिवल पुणेः २०२५
अनेक प्रवास…अनेक वेदना…अनेक आनंद…अनेक दृष्टिकोन…अनेक अनुभव…अनेक गोष्टी…अनेक प्रवास… इथं जमा झालेत. जगाच्या कानाकोपऱ्यातील लेखकांनी, शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या गोष्टी, नटून थटून जमा झाल्यात. नुसत्या जमा नाही झाल्यात तर त्याही मोठ्या उत्साहाने सजून सहभागी झाल्यात, अनेक रंग…अनेक लिपी…अनेक भाषा…अनेक आकार…अनेक बांधणी आणि अनेक फील घेऊन. नव्या कोऱ्या पानांचा ताजा सुगंध…ताज्या बायडिंगचा नवाकोरा स्पर्श…स्वतःला नीटनेटकं प्रेजेंटेबल बनवत, उभी…



